मी अजूनही शिवसेनेतच असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. सध्या ते रत्नागिरीतील पाली या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी आहेत.मी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो असतो, तर मी गुवाहाटीला गेलो असतो आणि तिथून तुमच्याशी बोललो असतो, असा टोला देखील त्यांनी पत्रकारांना लगावला. तसेच सध्या एकसंघ राहणं गरजेचं असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.
मी पक्ष जोडणारा आहे, तोडणारा नाही, असं उदय सामंत म्हणाले. मला वाटतं की, जे आपल्यापासून दूर गेले, त्यांच्याशी चर्चा करायला हवी. हे माझं वैयक्तिक मत आहे. या सगळ्या संदर्भात कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, असंही उदय सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट निर्माण केला, म्हणजे त्यांचे मत बदललं असं नाही, असंही उदय सामंत यावेळी म्हणाले.
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या मी पक्ष जोडणारा आहे, तोडणारा नाही, जे आपल्यापासून दूर गेले, त्यांच्याशी चर्चा...