टेटवली येथून किरकोळ वादातून महिला बेपत्ता

दापोली : तालुक्यातील टेटवली येथून एक तीस वर्षीय महिला घरातील किरकोळ वादातून कोणालाही न सांगता निघून गेली. याबाबत दापोली पोलिस ठाण्यात दि. 20 जून 2022 रोजी बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील टेटवली बौद्धवाडी येथील प्रतिभा प्रकाश तांबे (वय 30) यांचे पती प्रकाश रघुनाथ तांबे यांच्यासोबत घरगुती कारणावरून किरकोळ वाद झाला होता. याचा राग मनात धरून प्रतिभा तांबे दि. 9 जून 2022 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घरात कुणालाही न सांगता निघून गेल्या. नातेवाईकांनी व आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला असता त्या कुठेही आढळून न आल्याने 20 जून रोजी पती प्रकाश तांबे यांनी दापोली पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची खबर दिली असून या घटनेचा अधिक तपास महिला पोलिस कॉन्स्टेबल गावडे या करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button