श्री क्षेत्र टेरव येथे श्री भवानी मातेचा गोंधळ उत्साहात
चिपळूण : श्री क्षेत्र टेरव येथे श्री भवानी मातेचा गोंधळ नुकताच रूढी परंपरेनुसार रविवारी (दि. 19) उत्साहात झाला. भवानी माता ही कदम कुळांचे कुलदैवत आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे भवानी मातेच्या पूजेचा मान कदम कुळाचा असून त्यांना भोपे असे संबोधले जाते. पुजार्यांनी परंपरेनुसार पूजेची मांडणी व घट स्थापित केले. त्यानंतर राव कदम मराठा समाजातील देवस्थानाचे दोन मानकरी नीलेश कदम व दीपक कदम या मानकर्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी दिवट्या पाजळून पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. यावेळी अन्य ग्रामस्थांचीही उपस्थिती होती. तसेच देवीस गार्हाणे घालण्यात आले. दुसर्या दिवशी (दि.20) देवीला अभिषेक घातल्यानंतर गोंधळ विधीची सांगता झाली.