
शेवटच्या टप्प्यातील आंबा २० ते २५ मे च्या दरम्यान बाजारपेठेमध्ये येणार
आंबा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा आठ ते दहा दिवसांमध्ये हापूस आंबा मार्केटमध्ये जाण्याची शक्यता आहे. या शेवटच्या टप्प्यात पावसाने मेहेरबानी केल्यास सर्व आंबा हाती येऊन चांगले उत्पन्न मिळू शकेल. यावर्षी दोन टप्प्यांमध्ये हापूस कलमांना मोहोर आल्यानंतर पीकही समाधानकारक आले. ज्यांच्या बागेमध्ये आंबा आहे त्यांना चांगला दर मिळत असल्याने बागायतदारांमध्ये समाधान आहे. शेवटच्या टप्प्यातील आंबा २० ते २५ मे च्या दरम्यान बाजारपेठेमध्ये येणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे आंबा लवकर तयार होण्याची शक्यता आहे. या आंब्याला किती दर मिळेल यावर बागायतदारांचे गणित अवलंबून राहणार आहे.www.konkantoday.com