राधानगरी येथील फुलपाखरू उद्यानात ‘सदर्न बर्डविंग’ हे देशातील सर्वात मोठे फुलपाखरू आढळले

0
131

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील फुलपाखरू उद्यानात ‘सदर्न बर्डविंग’ हे देशातील सर्वात मोठे फुलपाखरू आढळले.त्याचा आकार १४० ते १९० मिमी आहे. हे फुलपाखरू काळसर रंगाचे असून, त्याचे पंख सोनेरी रंगाचे आहेत.
जैवविविधतेने संपन्न असा राधानगरी तालुका आता पर्यटनदृष्ट्याही विकसित होऊ लागला आहे. जागतिक वारसास्थळातील दाजीपूर अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच आता विविध पक्षी व फुलपाखरांसाठी प्रसिद्ध होऊ लागले आहे. राधानगरी वन्यजीव विभागामार्फत निसर्ग अभ्यासक सुहास वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली फुलपाखरू उद्यानाची निर्मिती झाली.

  • या उद्यानामध्ये सुमारे ५५ फुलपाखरांची, तर दाजीपूर अभयारण्यात १३५ हून अधिक फुलपाखरांची नोंद झाली आहे.
    फुलपाखरू उद्यानात सदर्न बर्डविंग या फुलपाखराची नुकतीच नोंद झाली असून, यामुळे राधानगरीची जैवविविधता आणखीनच स्पष्ट होत आहे. फुलपाखरू उद्यानात नावीन्यता व चांगल्या सोयीसुविधा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.राधानगरी (जि. कोल्हापूर) येथील फुलपाखरू उद्यानात सदर्न बर्डविंग हे देशाील सर्वात मोठे फुलपाखरू आढळले. त्याचा आकार १४० ते १९० मि.मी. आहे.
    हे फुलपाखरू काळसर रंगाचे असून, त्याचे पंख सोनेरी रंगाचे असतात. त्याचा पंख विस्तार १४० ते १९० मिमी असून, ते भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू आहे.
    www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here