कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडाजवळील जंगलात संशोधकांना मांसाहारी गोगलगाईची नवीन प्रजात आढळली

0
176

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडाजवळील जंगलात संशोधकांना मांसाहारी गोगलगाईची नवीन प्रजात आढळली आहे.सह्याद्रीमध्ये आढळल्यामुळे या गोगलगाईचे सह्याद्रीशिस असे नामकरण केले आहे.

मूळचे मिरज तालुक्यातील असलेले संशोधक डॉ. अमृत भोसले सध्या कऱ्हाडच्या सद्गुरु गाडगेमहाराज महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आणि त्यांच्यासोबत ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनचे तेजस ठाकरे आणि राधानगरी तालुक्याचे डॉ. ओंकार यादव सध्या सातारा जिल्ह्यातील मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे यांना नुकत्याच जाहीर झालेल्या विशाळगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह वनक्षेत्रात आंब्याजवळ सप्टेंबर २०१७, ऑगस्ट २०२० आणि सप्टेंबर २०२० मध्ये या प्रजातीच्या गोगलगाई आढळल्या. त्यांच्या ही गोगलगाईची नवीन प्रजात असल्याचे लक्षात आले. यासंदर्भातील संशोधनपर प्रबंध १० जून रोजी ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय जर्नल मोल्युस्कन रिसर्चमध्ये प्रकाशित झाला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here