
सिनेमा वेड्यांसाठी आज रत्नागिरीत पर्वणी
सिनेमा वेड्यांसाठी आज रत्नागिरीत पर्वणी आहे. आर्ट सर्कल रत्नागिरी आणि रत्नागिरी फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिग्दर्शकाचा सिनेमा आपण अनुभवणार आहोत. सुप्रसिद्ध लेखक आणि चित्रपट समीक्षक गणेश मतकरी दृक श्राव्य माध्यमासह सिनेमा प्रेमींशी संवाद साधणार आहेत.
याचबरोबर आणखी एक आकर्षण कार्यक्रमस्थळी आहे, ते म्हणजे सिनेमाशी निगडित वस्तू, पुस्तकं, दुर्मिळ फोटो, दुर्मिळ स्क्रिप्टस यांच्या संग्रहाचं प्रदर्शन!!
शूटिंग सुरू असताना कन्टिन्यूटीसाठी काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो, उंबरठा या मराठी सिनेमाची मूळ पटकथा, सिनेमा रिलीज होण्यापूर्वी पत्रकारांसाठी काढलेल्या पत्रकांच्या मूळ प्रती, पोस्टर्स, अशा दुर्मिळ आणि मौल्यवान गोष्टींचा खजिना या प्रदर्शनाच्या निमित्ताने खुला केला आहे.
आजचा कार्यक्रम आणि प्रदर्शन दोन्हीही चुकवू नकाच!!
ठिकाण: राधाबाई शेट्ये सभागृह
वेळ: प्रदर्शन: 4 ते 6
कार्यक्रम: 6 ते 8