खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या 5 व्या पूर्णगड शाखेचा शानदार उद्घाटन सोहळा नाट्यकर्मी राम सारंग यांच्या शुभहस्ते संपन्न


रत्नागिरी:खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीच्या ५ व्या शाखेचे पूर्णगड रूपाने ८ आँक्टोबर रोजी छानदार उद्घाटन नाट्यकर्मी राम सारंग यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.गतपाच वर्षात खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी यांची घौडदौड वाखाणण्याजोगी आहे.पाचही शाखेच्या उद्घाटन प्रसंगी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय एकत्र येऊन शाखेंचे उद्घाटन करणे म्हणजे सहकार मेळ्याची अनुभूती या संस्थेने दाखवून मौलिक कार्य यांच्या हातून होताना दिसत आहे.पाच वर्ष पूर्ण होण्याआधीच पाच शाखांची निर्मिती हे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव उल्लेखनीय काम म्हणून खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव महाराष्ट्रात भविष्यात चिरंतन राहील.सर्व संचालक व संस्थेशी जोडलेले सर्व बंधूंभगिनींच्या साथीने उत्तम संघटक म्हणून अध्यक्ष संतोष पावरी यांनी संस्थेला उभारी देण्याचे काम केले आहे असे वक्तव्य स्वरूपानंद संस्थेचे अध्यक्ष श्री दिपक पटवर्धन यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
माझ्या परिसरातील बंधूभगिनींना सभासद करून पतसंस्थेचे लाभ मिळवून द्यावेत.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे सहकार्य लागेल ते आम्ही देऊ असे प्रतिपादन पूर्णगड गृप ग्रामपंचायत सरपंच सौ.सुहासनी धानबा यांनी केले.
शंकर लाकडे, अविनाश डोर्लेकर यांनी खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीचे भविष्य उज्ज्वल आहे व समाजाला पुढे नेण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून होताना दिसत आहे.आपण संस्थेच्या माध्यमातून घेतलेले कर्ज हे योग्य कामासाठी वापरा व कर्जाचे हप्ते वेळेत भरून सहकार्य करा असे समाजाला आवाहन केले.
प्रामाणिक,सुज्ञ व विश्वासू संचालक व काटेकोरपणे पतसंस्थेचे व्यवहार सांभाळणारे प्रशासकीय अधिकारी यांच्या एकजूटीनमुळेच चांगले कार्य म्हणून महाराष्ट्रातील कोकण विभागातून सहकार क्षेत्रातील एक नंबरचा पुरस्कार खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला मिळाला म्हणून मी सर्वांचे अभिनंदन करतो.चांगले नेतृत्वच समाजव्यवस्थेला उभारी देऊन शकते हे गत पाच वर्षाच्या कार्यावरून या पतसंस्थेच्या चालकांनी सिध्द करून दाखवले आहे.असे वक्तव्य उद्घाटक राम सारंग यांनी करून संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
संस्थेचा कारभार गतिमान राखण्यासाठी माझ्या बरोबरीने काम करणारे उपाध्यक्ष सुधीर वासावे,सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी,सर्व समन्वय समिती पदाधिकारी, सदस्य व संस्थेच्या हितचिंतकांमुळेच दिपस्तंभासाखी उभी राहिली आहे.संस्थेचे सदस्य हे मालक म्हणून सहभागबरोबरच संस्थेला उभारी देण्याचे कार्य करीत आहेत, सभासद ही आमची पुंजी आहे यांच्या सहकार्यानेच भविष्यातील योजना राबविण्यात व त्यांच्या सन्मानाबरोबर त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी संस्था कटिबद्ध राहिल.असे वक्तव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी केले.
संस्थेने पाच वर्षात १३ कोटींपेक्षा अधिकतेने भागभांडवल उभे करून संस्था प्रगतीपथावर जात असल्याचे कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे यांनी प्रास्ताविक मध्ये सांगून संस्थेच्या वाटचालीची विस्तृत माहिती दिली.
या उद्घाटन कार्यक्रमाला संपूर्ण जिल्हाभरातून सभासद उपस्थित राहिले होते.पूर्णगड येथील शाळा क्रं.१ मध्ये तुडुंब गर्दीने या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा पालक वासुदेव वाघे, दिनेश डोर्लेकर ,मदन डोर्लेकर, कमलाकर हेदवकरसर, स्थानिक समन्वय समिती पदाधिकारी,पुर्णगड येथील ग्रामस्थ बंधूभगिंनी सहकार्याबरोबरच शाखेसाठी विविध वस्तू देणगी रूपाने दिल्या.शाखा उद्घाटन पूर्वीच शाखा सुरू करण्यासाठी १ कोटी १७ लाख ठेवी आणण्याचे काम या सर्वांनी केले आहे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वासुदेव वाघे यांनी तर आभार प्रदर्शन मदन डोर्लेकर यांनी केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button