
सावर्डे येथील पॉलिटेक्निकमध्ये एस क्रिएटर्स प्रदर्शनाला प्रतिसाद
सावर्डे : येथील सह्याद्री पॉलिटेक्निकच्या ‘एस क्रिएटर्स’ या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक संजीव अणेराव यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. यावेळी आ. शेखर निकम, सह्याद्रीच्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे प्राचार्य जाधव यांनी यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. सह्याद्री पॉलिटेक्निकच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी 40 प्रकल्प सादर केले. त्यामध्ये दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक ट्रायसिकल, इलेक्ट्रिक सायकल, बाईक्स, तसेच फोर व्हील बग्गी, टायरचा उपयोग करून बनविलेला रोड, प्लास्टिक बाटल्यांचा फर्निचरसाठी वापर, रोबोट, ड्रोन, विविध सॉफ्टवेअर यांची विध्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणे सादर केली. या प्रदर्शनाला नामवंत मान्यवर तसेच इंग्लिश मेडीयम सावर्डे, आयटीआय, विविध हायस्कूलच्या विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी भेट दिली. प्राचार्य मंगेश भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रदर्शनाला अनेकजण भेट देेऊन कौतुक करत आहेत.