
कामथे येथे अडीच लाखांची चोरी
चिपळूण : कामथे येथील ईगल कंपनीच्या आवारातून अडीच लाख रूपये किमतीच्या बूमप्रेशर मशीनचा रिमोट कंट्रोल चोरीस गेला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी विजयपाल छोटेलाल पाल (23, रा. मध्यप्रदेश) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 26 मे रोजी सकाळी 11 वा. कामथे येथील ईगल इन्फ्रा कंपनीच्या आवारात घडली. या प्रकरणी जयंतीलाल नोनेचा यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार कंपनीच्या आवारात असलेला रिमोट कंट्रोल विजयपाल लाल याने नजर चुकवून चोरून नेला. यामध्ये कंपनीचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.