15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड -19 लसीकरणाचा शुभारंभ

कोविड- 19 लसीकरण राज्यांमध्ये सुरु करण्याबाबत शासनस्तरावरुन सुचना दिलेनुसार सोमवारी 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड -19 लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला .15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड -19 लसीकरण डॉ . श्री . अनिरुध्द आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या हस्ते नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोकणनगर , रत्नागिरी येथे शुभारंभ करण्यात आला . मात्र प्रत्यक्षात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय , उपजिल्हा रुग्णालय , नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र , प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर 15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोविड -19 लसीकरण आठवड्यातून दोन वार म्हणजेच बुधवार व शनिवार या दोन दिवशी घेण्यात येत आहे . सदरच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लसीचाच वापर करण्यात येणार आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button