शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यास मुदतवाढ

रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी संकेतस्थळावरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. आता लाभार्थ्यांना 31 जुलै 2022 पर्यंत ई केवायसी करता येईल. यापूर्वी ही मुदत 31 मे पर्यंत होती.
पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकर्‍यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जे शेतकरी ई-केवायसी करतील, अशाच पात्र लाभार्थ्यांना यापुढे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल. जिल्ह्यात गुरूवारपर्यंत एकूण 4 लाख 98 हजार 80 शेतकर्‍यांपैकी केवळ 2 लाख 98 हजार 623 शेतकर्‍यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित 2 लाख 79 हजार 457 ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहेत. तरी या लाभार्थ्यांनी तत्काळ आपले ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button