
रत्नागिरीत चरस विकताना अटक केलेल्यास पोलिस कोठडी
रत्नागिरी : पोलिसांनी मच्छिमार्केट परिसरात शुक्रवारी दुपारी 80 ग्रॅमच्या चरस या अमली पदार्थासह अटक केलेल्या संशयिताला न्यायालयाने 6 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आकाश उर्फ सलमान अशोक डांगे (वय 29, रा. थिबा पॅलेसरोड, रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी अंडी विक्रेत्याचे वेशांतर करून ही कारवाई केली होती. शनिवारी डांगेला न्यायालयात हजर करण्यात आले होते.