
रत्नागिरीतून बिहारकडे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका ट्रकला धडकली; चालक ठार, दोन जखमी
रत्नागिरी : रत्नागिरीकडून बिहारकडे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका अनियंत्रितपणे ट्रकला धडकली. या अपघातात रत्नागिरीतील रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील दुबेपूर रसैना गावाजवळ आज गुरुवारी सकाळी रत्नागिरीतून बिहारकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेची ट्रकला धडक बसली. या अपघातात रुग्णवाहिकेतील तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले असता एकाचा मृत्यू झाला तर दोन जणांवर उपचार सुरू आहेत.
मृतदेह घेऊन रुग्णवाहिकेतून तीन जण बिहार येथे जात होते. मिर्झापूर जिल्ह्यातील दुबेपूर रासेना गावाजवळ रुग्णवाहिका नियंत्रणाबाहेर जाऊन ट्रकला धडकली.
माहिती मिळताच स्टेशन प्रभारी पदरी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. तेथून गंभीर जखमी चालक फिरोज पावसकर यांना शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पडरी पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेऊन नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.
यातील जखमी रुग्णवाहिका चालक फिरोजचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याने त्याच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.