
झाडगाव येथे बेदरकार कार चालवून समोरून येणाऱ्या कारला दिली धडक
रत्नागिरी : बेदरकारपणे कार चालवत असताना रस्त्याच्या विरूध्द दिशेला जात समोरून येणार्या कारला धडक दिली. याप्रकरणी कार चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास नारायण निकाळजे (वय 34, रा. पनवेल, रायगड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. अपघाताची ही घटना सोमवार 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10.50 वा. सुमारास झाडगाव येथील एमएसईबी ऑफीससमोर घडली. त्याच्याविरोधात रोहन राजेंद्र कामेरकर (वय 29, रा.भांडूप, मुंबई) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सकाळी रोहन आपल्या ताब्यातील पोलो कार (एमएच-03 -सीएस-4344) मधून त्याचे काका संजय नामदेव कामेरकर यांना घेऊन जात होता. त्याच सुमारास विलास निकाळजे आपल्या ताब्यातील महिंद्रा टीयुव्ही (एमएच-06-बीएम-3805) घेऊन भरधाव वेगाने समोरून आला. विलासचा आपल्या कारवरील ताबा सुटला. त्याने रोहनच्या कारला धडक देत अपघात केला. या अपघातात रोहन आणि त्याचे काका संजय यांना दुखापत झाली आहे. अधिक तपास सहायक पोलिस करत आहेत.