मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे कारची दुचाकीला धडक, एक जखमी


मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे काळकाई एंटरप्रायझेससमोर गुरुवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत शंकर भिमराव भोसले (४०, रा. तिसंगी-खेड) जखमी झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. कारचालक हा कार घेवून (एमएच ४७ बीबी ८२४७) मुंबईहून खेडच्या दिशेने येत असताना दुचाकीला (एमएच ०८ बीडी ३१०२) पाठीमागून धडक दिली. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button