
तारकर्ली दुर्घटनेतील यमदूताला मागे सारणारे देवदूत मामा-भाचे
वेळ दुपारी १.३० वाजता दुर्घटना घडल्याच्या अगदी काही क्षणातच मच्छिमार नेते दिलिप घारे यांचा फोन विकी तोरसकर च्या फोनवर आदळला’व्हेंटिलेटर पाहिजे’.नेहमी सामाजीक कामात अग्रेसर असलेल्या आणि रेडकर हॉस्पिटल चा विश्वस्त असल्यामुळे, प्रसंगा च गांभीर्य तसेच रुग्णाच्या आजारात गोल्डन अवर च्या वेळच महत्त्व माहीत असल्याने डॉ.विवेक रेडकर, डॉ.दर्शन खानोलकर तसेच हॉस्पिटल व्यवस्थापन यांना कल्पना दिली आणि तयार राहण्यासाठी सांगितले.थोड्याच वेळात रुग्ण दाखल झाला.अतिशय अत्यवस्थ असलेल्या पेशंट चा ताबा डॉ.विवेक रेडकर यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली आयसीयूमध्ये असलेल्या डॉ.धनंजय आणि टीम ने घेतला.तर रुग्ण च्या नातेवाईक यांना धीर देऊन मानसिक आधार देण्याचं काम ,तसेच त्यांच्या निवास व्यवस्थे च काम विकी तोरसकर यांनी केलं.
डॉ. विवेक रेडकर यांनी आपली सगळी काम बाजूला ठेऊन नेहमी प्रमाणे गेल्या पस्तिस वर्षातील अनुभव पणाला लावला.योग्य वेळेत मिळालेला उपचार, रुग्णाने दिलेली साथ, सर्वांच्या सदिच्छा याचा उपयोग रुग्णाची तब्येत सुधारणा होण्यात झाला.आयसीयू मध्ये व्हेंटिलेटरवर असलेला पेशंट हळूहळू बाहेर आला.दोनच दिवसापूर्वी त्याला डिस्चार्ज पण मिळाला.त्यावेळेस त्यांचे नातेवाईक आणि मित्र(जे त्या दुर्घटने वेळी त्यांच्याबरोबर होते)त्यांच्या प्रतिक्रिया खूप बोलक्या होत्या.
काही कामा निमित्ताने मी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे सर्व प्रसंगाला मी साक्षीदार होते.या सर्वांची धावपळ मी बघत होते.
खरंच त्या रुग्णाच्या भोवती यमदूत रेंगाळत होता पण डॉ.विवेक रेडकर आणि विकी तोरसकर हे मामा- भाचे देवदूत म्हणून उभे राहिले. आणि यमदूताला मागे सारल.खरंच धन्यवाद आपल्या दोघांना आणि आपल्या टीम ला उदंड आरोग्य दाई आयुष्य लाभो याच शुभेच्छा.
तारकर्ली बोट दुर्घटनेची चर्चा सर्व मीडिया,सोशल मिडिया प्लॅटफॉर्म या सर्वांवर चालु आहे. या छोट्याशा लेखाने सक्षम। आपत्कालीन आरोग्य यंत्रणा या विषयावर पण सखोल चर्चा व्हावी हीच माफक अपेक्षा.
सौ.संगीता महाडिक,
रत्नागिरी