कामावर जाण्यासाठी झोपेतून उठवणार्‍या पत्नीच्या डोक्यात घातला पाट, नाचणे येथील घटना

रत्नागिरी : झोपेत असलेल्या पतीला उठवून “कामावर जा” असे सांगितल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी पाट मारला. याशिवाय शिवीगाळही केली. ही घटना नाचणे गोडाऊन स्टॉप येथे शनिवार 28 मे रोजी सायंकाळी 7.30 वा.  घडली असून पती विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश बाळकृष्ण बेटकर (वय 40, सध्या रा. गोडाऊन स्टॉप, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पत्नी सानिका नीलेश बेटकर (वय 39,  सध्या रा.गोडाऊन स्टॉप, रत्नागिरी) हिने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. हे दोघेही मूळ राहणार असोडे खानू, लांजा येथील आहेत. नीलेश कामावर गेला नाही म्हणून सानिका त्याला उठवू लागली. या रागात सानिकाच्या डोक्यात पाट मारून तिला शिवीगाळ केली. याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button