ईडीचे पथक दुसऱ्या दिवशीही मुरूड मध्येच!मुरूड ग्रा.पं. मध्ये जाऊन घेतल्या कागदोपत्री अधिकृत नक्कला

दापोली
रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित मालममत्तांची चौकशी ईडीने सुरु केली असून वर गुरुवारी ईडीचे पथक मुरूड येथे दाखल झाले आहे. दुसऱ्या दिवशीही दापोली मुरुड येथेच हे पथक थांबले होते. मुरूड ग्रामपंचायतीकडून अनिल परब यांच्या नावे असलेल्या काही कागदपत्रांच्या नक्कला ईडीने ताब्यात घेतल्या आहेत.रितसर अर्ज करुन मुरुड ग्रामपंचायत कार्यलयात जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती शुक्रवारी दुपारी घेतली आहे. यामध्ये एसीसमेंट उतारा,आकारणी आदी कागदपत्रे यांचा समावेश आहे.                                                                          दरम्यान या सगळ्या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत काही कागदपत्रे सादर केली आहेत. मुरूड ग्रामपंचायतकडून करण्यात आलेली आकारणी यासाठी असलेला परब यांचा अर्ज आदी कागदोपत्र या सगळ्याच्या प्रती अधिकृतपणे ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या आहेत त्यामुळे आता एकंदरच या प्रकरणाची उत्सुकता वाढली आहे. हे पथक शुक्रवारी दुपारनंतर परत मुंबईत गेले अथवा नाही याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.                                                             दरम्यान अनिल परब यांची चौकशी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) यांच्याकडुन सुरु असली तरी अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती लगला किंवा कसे याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया ईडीकडून आलेली नाही.  या सगळ्या पार्श्वभूमीवर दापोली येथील अनिल परब समर्थक ११ जून रोजी पालकमंत्री अनिल परब दापोली दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती परब समर्थकांकडून दिली जात आहे. मात्र आता दापोली शहरात अनिल परब कोणत्या विकासकामांची भूमिपूजन अथवा उद्घाटन करणार याचीही उत्सुकता अनेकांना लागुन राहीली आहे.

साई रिसॉर्ट प्रकरणी चौकशी सुरू झाल्याने हा विषय अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा ठरला आहे पण या रिसॉर्ट जवळ आपला कोणताही सबंध नाही अस स्पष्ट केले आहे.अस असेल तर ईडी चौकशी जाणीवपूर्वक चौकशी प्रक्रिया करत आहे का? असे अनिल परब याना सुचीत कारायचे आहे का?असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमधील दोन मंत्री ईडीच्या कारवाईनंतर तुरुंगात आहेत. त्यामुळे आता  नंबर अनिल परब यांचा त्यानी आता कपडयाची बॅग भरायला घ्यावी असा थेट आरोप भाजप नेते किरीट सोमय्या सांगत आहेत.

त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणातील चौकशीची उत्सुकता लागून राहिली आहे. परिवहन मंत्री तथा पालकमंत्री अनिल परब यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या चौकशी अजून किती काळ चालेल हे मात्र अद्याप स्पष्ट झालेल नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button