
जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडींना मिळणार ३२ इंची टीव्ही
रत्नागिरी : आता प्रत्येक क्षेत्रात डिजिटलला महत्व आले असून जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांनाही डिजिटल करण्याच्या दृष्टीने जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाने निर्णय घेतला असून जिल्ह्यातील १६४ आदर्श अंगणवाडींना ३२ इंची टीव्ही देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी ३२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही टीव्हीची सुविधा उपलब्ध झाल्याने अंगणवाडी सेविकांना मोबाईल जोडून किंवा केबलमार्फत मुलांना स्मार्ट बनविण्याच्या दृष्टीने शिक्षण देण्यात येणार आहे.
www.konkantoday.com