रत्नागिरी भाजपा नगरसेवकांनी घेतली मुख्याधिकारांची भेट

रत्नागिरी नगर परिषद मधील भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवकांनी आज भाजपा जिल्हाध्यक्ष अँड.दीपक पटवर्धन यांच्या निर्देशानुसार रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेतली.यावेळी पावसाळापूर्व नियोजनाच्या कामाबाबतीत विस्तृत चर्चा करण्यात आली.शहरातील सर्व नाले गटार साफसफाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यासोबतच सद्य परीस्थीतीत बाजारपेठ व सहकारी संस्था बंद झाल्यावर दररोज निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा मांडण्यात आला की येणाऱ्या आर्थिक वर्षातील पाणीपट्टी नगरपरिषदेने माफ करावी तसेच यंदाची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने न घेता सोशल डिस्टंसिंगचे पालन करत ती नेहमीप्रमाणे आयोजित करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन केली.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री सचिन करमरकर गटनेता श्री समीर तिवरेकर नगरसेवक श्री सुशांत चवडे नगरसेविका सौ मानसी करमरकर सौ रायकर सौ रसाळ श्री उमेश कुलकर्णी श्री राजू तोडकर उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button