
चिपळूण खेर्डी रेल्वेट्रॅकवर एर्नाकुलम् हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसखाली महिलेची आत्महत्त्या
__चिपळूण खेर्डी रेल्वेट्रॅकवर एर्नाकुलम् हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसखाली गुरुवारी दुपारी ३.१० वाजता एका महिलेने आत्महत्त्या केली. मात्र या महिलेची ओळख पटलेली नाही.गुरुवारी दुपारी खेर्डी रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात महिलेने एर्नाकुलम् हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसखाली खेर्डी पुलावर आत्महत्या केल्याने तिच्या धडाचे दोन तुकडे झाले होते. ही एक्स्प्रेस दिल्लीकडे जात होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कामथे उपजिल्हा रुग्णालयात आणला असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. www.konkantoday.com




