मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाई करण्याचा गुहागर नगराध्यक्ष बेंडल यांचा इशारा

0
51

गुहागर : नगरपंचायत हद्दीतील उनाड गुरांच्या मालकांना नगरपंचायतीमध्ये बोलावून समज दिली जाईल. त्यानंतरही त्यांची गुरे अन्यत्र भटकत असताना सापडली किंवा कोणी आणून दिली तर कोंडवाड्यात ठेवून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी नागरिकांना दिले.
रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेल्या उनाड गुरांमुळे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. अनेकांच्या वाडीतील नारळी पोफळीची रोपे खाऊन टाकली. शिंपण्यासाठी लावलेले ठिबक सिंचनाच्या वाहिन्या गुरांच्या फिरण्यामुळे मोडल्या आहेत. काहींनी अंगणात वाळत घातलेले गहू, तांदूळ गुरांनी खाल्ले. रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेल्या उनाड गुरांमुळे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. नुकसानीला कंटाळून अखेर गुहागर शहरातील 20-25 नागरिकांनी नगराध्यक्षांची भेट घेतली.
उनाड गुरांमुळे होणारे नुकसान, मालकांकडून मिळणारी अरेरावीची उत्तरे याबाबत नगराध्यक्षांना माहिती दिली. उनाड गुरांच्या त्रासामधून कायमची सुटका करावी, अशी विनंती केली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई नगरपंचायत करेल, असे आश्‍वासन नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here