उत्तर रत्नागिरीतील नाराजांची समजूत काढणार : खासदार राऊत

0
58

रत्नागिरी : चिपळूणसह पाच तालुक्यातील शिवसैनिकांमधील मतभेद दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार असून त्यांची लवकरच समजूत काढली जाईल, असा विश्वास शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीतील रत्न कृषी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी खासदार राऊत बोलत होते. जिल्हा संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी चिपळुणात झालेल्या बैठकीवेळी पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्या राजीनाम्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावरील नाराजी शिवसैनिकांनी उघडपणे व्यक्त केली होती. त्या बैठकीत शिवसैनिकांमधील मतभेद उघड्यावर आले होते. याची दखल वरिष्ठ स्तरावरही घेण्यात आली आहे. तसेच शिवसेना नेते रामदास कदम यांना पुन्हा सक्रीय करण्यासाठीही पावले उचलली जात आहेत. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये असलेले मतभेद दूर करण्यासाठी संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख काम करत आहेत. तेथील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत आहेत. त्याचबरोबर चिपळुणातील नाराज शिवसैनिकांशी लवकरच मी स्वतः चर्चा करणार आहे. त्यांची समजूत काढणार
आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here