लांजातील कार्यसम्राट चषकाचा नंदराज कुरूप संघ मानकरी, गावखडी उपविजेता

आ. राजन साळवी पुरस्कृत शिवसेना युवा सेनेच्यावतीने आयोजित कार्यसम्राट चषकाच्या विजेतेपदावर लांजातील नंदराज कुरूप इलेव्हन या संघाने नाव कोरले. गावखडीच्या जिगर साई इलेव्हन या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला दोन लाख तर उपविजेत्या संघाला एक लाख व प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा लांजा केळंबे येथील उदय खानविलकर क्रिकेट स्टेडियम येथे झाली. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळाला. अंतिम सामन्यात नंदराज कुरूप इलेव्हन हा संघ विजेता ठरला. विजेत्या संघाला आ. राजन साळवी व त्यांच्या पत्नी अनुजा साळवी यांच्याकडून रोख दोन लाख रूपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. जिगर साई इलेव्हन गावखडी संघ उपविजेता ठरला. उपविजेत्या संघाला रोख एक लाख व आकर्षक चषक देवून मुंबईचे युवा उद्योजक प्रीतम सावंत यांच्याकडून गौरविण्यात आले. मालिकावीर अमोल भोसलेला 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, उत्कृष्ट फलंदाज नवल नाईक व उत्कृष्ट गोलंदाज रवी चुंबक यांना एलईडी टी. व्ही. व आकर्षक चषक देण्यात आला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी जयदीप भोंगवले यांना मोबाईल व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, उपनगराध्यक्ष स्वरुप गुरव, सुभाष मालप, मयुरेश भट, संतोष राठोड, गणेश लाखन, रामदास खानविलकर, प्रीतम सावंत, यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button