मुंबई गोवा महामार्गावर खवटी नजीक क्वालीस कारला अपघात, चालक ठार तर सातजण जखमी ; पहाटे ३ वाजता झाला अपघात
——————————–
खेड : मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका अदयाप सुरूच आहे. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील क्वालीस कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात क्वालिसचा चालक ठार तर क्वालिसमधून प्रवास करणारे अन्य सात प्रवाशी जखमी झाले. महामार्गावरील खवटी गावानजीक हा अपघात घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथून मुंबईकडे प्रवाशी घेऊन निघालेली क्वालीस कार पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील खवटी गावानजीक आली असतात चालकाला डुलकी लागल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि टी कार ती भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोवर जाऊन धडकली. या अपघातात चालक किशोर चव्हाण यांच्यासह कारमधील अन्य सात प्रवासी जखमी झाले.
अपघातादरम्यान झालेला जोराचा आवाज आणि त्यानंतर .उमटलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकून अआजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची खबर पोलिसांना देताच महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचारी समेळ सुर्वे हे तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसह घटनाथली दाखल झाले. दरम्यान खेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. होते. मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहचलेल्या ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी अपघातग्रस्त प्रवाशांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. मात्र चालक किशोर चव्हाण याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. अन्य सात जणांवर कळंबणी उप्लजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्याच्या हद्दीतील महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले असल्याने महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. खेड पोलीस या अपघाता प्रकरणी अधिक तपास करत आहेत.