
गोवा कला ऍकॅडमी येथे झालेल्या इंटरनॅशनल डान्स कॉन्टेस्ट, अखिल नटराजम संघ, भारत नृत्य महोत्सव २०२५ मध्ये सरस्वती डान्स ऍकॅडमीचे सुयश
गोवा कला ऍकॅडमी येथे झालेल्या इंटरनॅशनल डान्स कॉन्टेस्ट, अखिल नटराजम संघ, भारत नृत्य महोत्सव २०२५ मध्ये सरस्वती डान्स ऍकॅडमी कारवांचीवाडीच्या स्पर्धकांनी सुयश प्राप्त केले आहे.
भरतनाट्यम् नृत्य शैली सरस्वती डान्स अकॅडमी, कारवांचीवाडी, रत्नागिरी, गुरु. सौ स्नेहल कळंबटे नागले यांना बॉलिवूड कोरिओ डान्स डायरेक्टर वैभव घुगे सर यांच्या हस्ते ‘नृत्य शिरोमणी वॉर्ड’ , ’ नृत्य भारती ऍवॉर्ड प्रदान करण्यात आला.
२. लावणी प्रिन्स- शुभम बोराडे सर, यांच्या हस्ते ’नृत्य गुरुवर्य ऍवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
३. तसेच सरस्वती डान्स अकॅडमी च्या ३ विद्यार्थ्यांनीना इंटरनॅशनल डान्स कॉन्टेस्ट मध्ये सुयश मिळवले असून त्यामध्ये
१. आकांक्षा संदिप पवार – सेकंड अवॉर्ड २.रोहिणी बाळू गित्ते – सेकंड ऍवॉर्ड, ३. आर्द्रा अनुप नायर – सेकंड अवॉर्ड.
सरस्वती डान्स ऍकॅडमी कारवांचीवाडी यांनी मिळविलेल्या सुयशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.




