
राजापूर नगर परिषदेच्या वतीने नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने फायबर बोटीतून प्रात्यक्षिक.
राजापूर : शहरात पावसाळ्यात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राजापूर नगर पालिकेच्या वतीने नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने नियोजन केले आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून राजापूर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अर्जुना नदीपात्रात खाडी किनारी फायबर बोटीचे प्रात्यक्षिक घेतले. राजापूर नगर पालिकेमार्फत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत प्रशासक तथा सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. जैसमीन, तसेच मुख्याधिकारी वैभव गारवे, पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदशर्नाखाली फायबर बोटच्या माध्यमातून प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी स्वच्छता निरीक्षक अमित पोवार, मुकादम राजन जाधव तसेच सुशील यादव, प्रणय जाधव, ओंकार तांबे, संदीप कुळी, किशोर धांगट, सागर जोगले, दिनेश पवार, नरेश घुमे आदी कर्मचारी उपस्थित होते.