डी मार्टजवळ अपघात झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी : मालवण-रत्नागिरी एसटीला धडक बसून झालेल्या अपघातातील जखमी तरुणाचे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरानजीकच्या डी – मार्ट समोरील रस्त्यावर रविवारी सायंकाळी दुचाकी आणि एसटीची समोरासमोर धडक झाली. सोमवारी सकाळी 7 वा. मृत्यू झाला. विथीलेश विनायक फगरे (वय 22, रा. फगरवाठार, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी तो हातखंब्याच्या दिशेने जात होता.