877 एकूण पॉझिटिव्ह, बरे झाले 627,ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह 219

रत्नागिरी दि. 13 (जिमाका): आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 13 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 877 झाली आहे. दरम्यान 38 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 627 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्के आहे. आज बरे झालेल्यांमध्ये दापोली येथून 12 , घरडा येथून 11, जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 1, कोव्हीड केअर सेंटर, पेढांबे येथून 3 आणि 11 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालील प्रमाणे

रत्नागिरी 2

कामथे 1

कळंबणी 5

लांजा 1

मंडणगड 4 रुग्णालयातून प्राप्त माहितीनुसार चिपळूण येथील एका 72 वर्षीय रुग्णाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 31 झाली आहे. ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह ची संख्या 219 असून आज पूर्ण गद्रे कंपनी ऐवजी गद्रे कपंनी मधील कॅबस्टिक प्लांट - परिसर, मौजे शिरगाव हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह – 877

बरे झालेले – 627

मृत्यू – 31

एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 219

पैकी 199 रुग्ण रुग्णालयात दाखल,

13 रुग्ण होम आयसोलेशन,

4 रुग्ण इतर जिल्हयात उपचारासाठी गेले

3 रुग्ण दाखल होणे बाकी

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन*
जिल्ह्यात सध्या 82 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 23 गावांमध्ये, दापोली मध्ये 7 गावांमध्ये, खेड मध्ये 18 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 20 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 2 आणि राजापूर तालुक्यात 6 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 55, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 09, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 07, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी – 2, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 6, ग्रामीण रुग्णालय गुहागर-4, केकेव्ही, दापोली – 10 असे एकूण 94 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 11 हजार 773 इतकी आहे.
11 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 12 हजार 477 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 12 हजार 122 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 877 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 11 हजार 233 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 355 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 355 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 12 जुलै 2020 अखेर एकूण 1 लाख 78 हजार 092 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 94 हजार 377 आहे.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती दि. 13 जुलै 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो. पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button