
समुद्राचं सौंदर्य कायम राहण्यासाठी,रत्नागिरीत स्वच्छता मोहीम
रत्नागिरी जिल्हा आता प्लॅस्टिक मुक्त कसा होईल यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. याच धर्तीवर भाट्ये किनारी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली. पर्यटकांकडून समुद्र किना-यावर मोठ्या कचरा टाकला जातोय या कच-यात प्लास्टीकचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय यामुळं समुद्र किनारे अस्वच्छ दिसतात.समुद्राचं सौंदर्य कायम राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलीय.आज रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी बी.एन पाटील, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधीकारी इंदुराणी जाखड यांच्यासह रत्नागिरीमधील अधिकारी वर्ग आणि नागरिक, एनसीसीचे विदयार्थी यांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी नागरिक, पर्यटक यांना देखील प्लॅस्टिक मुक्त मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी काळात नागरिकांमध्ये प्लॅस्टिकबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्याबाबत काही योजना केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिली.
www.komkantoday.com