
एसटीच्या सेवानिवृत्त कामगारांवर उपासमारीची वेळ ,महाराष्ट्र एसटी संघटनेने लक्ष वेधले
एसटीच्या सेवानिवृत्त कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. लालपरीच्या या सेवकांना औषधपाण्यासाठीही पैसे नाहीत, त्यांची देणी तातडीने एकरकमी देण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे आणि अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे.
महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महामंडळाचे वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखाधिकारी मंदार पोहोरे यांची भेट घेवून सेवानिवृत्तांच्या व्यथा या नेत्यांनी मांडल्या. संदीप शिंदे यांनी सांगितले की, सन २०१८ पासून सेवानिवृत्तांची आणि मृत कर्मचार्यांची अंतिम देयके प्रलंबित आहेत. रजेचे वेतन आणि एकतर्फी वेतनवाढीचा फरक अद्यापही त्यांना दिलेला नाही. जवळ पैसे नसल्याने सेवानिवृत्त कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या महामडळाची ३०-३५ वर्षे सेवा केली. ज्या लालपरीसाठी घाम गाळला त्या लालपरीच्या सेवकांना औषध पाण्यासाठीही पैसे नाहीत, ही अत्यंत दुदैवी बाब आहे.
www.konkantoday.com