२७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांची तिकिटे फुल्ल
कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे कोकणात येऊ न शकलेल्या चाकरमान्यांनी आत्तापासूनच गणेशोत्सवात गावी येण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांची तिकिटे फुल्ल झाली आहेत.रेल्वेचे तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना आता जादा एक्सप्रेस गाड्यांची प्रतीक्षा आहे. यंदा उच्चांकी संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गात येण्याची शक्यता आहे.
यंदा ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे २७ ऑगस्टपासूनच चाकरमान्यांनी कोकणात येणाऱ्या सर्व गाड्यांची तिकीटे फुल्ल झाली आहेत. यात २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या दरम्यानच्या गाड्यांमध्ये वातानुकुलीत टू आणि थ्री टियरच्या जागाही संपल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही क्लाससाठी वेटिंग लिस्ट शिल्लक नसून तिकीट बुक करण्याचा पर्यायच शिल्लक नसल्याचे चित्र आयआरसीटीच्या संकेतस्थळावर दाखवले जात आहे.
www.konkantoday.com