
या वर्षी मच्छीमारांचा व्यवसायात जम बसेना !
हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटल्यानंतरही सतत बदलत असलेल्या वातावरणाचा परिणाम मच्छिमारी व्यवसायावर झाला आहे. सध्या वादळी सदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याने मच्छीमारी ठप्प झाले आहे.त्यातच खोल समुद्रात परप्रांतीय नौकांच्या अतिक्रमणामुळे गेलेल्या नौकांना मच्छी मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत. अस्थिर वातावरणामुळे नेहमी मिळणारे सुरमई कोळंबी मासे मिळत नसून गेजर किंवा को केरा सारखे कमी प्रतीचे मासे मिळत असल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत .
www.konkantoday.com