
चिपळुणात महावितरणाच्या वतीने पावसाळी तयारी सुरू
सव्वा महिन्यावर पावसाळा आल्याने महावितरणने आपली तयारी सुरू केली आहे. वीजवाहिनीवर आलेली झाडे व फांद्या तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी ७० कर्मचारी या कामाला लागले आहेत. आतापर्यंत २५ टक्के काम झाले असून दर सोमवारी या कामाला अधिक वेग येणार आहे.जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा विचार करता सर्वाधिक पाऊस चिपळुणात पडतो. त्यातच अनेकदा वादळही होते. त्यामुळे जुनी व मोठी झाडे उन्मळून पडण्यासह फांद्या तुटण्याचे प्रकार शहरासह तालुक्यात सातत्याने घडताना दिसतात. यातील काही झाडे व फांद्या वीजवाहिन्यांवर पडत असल्याने महावितरणचे मोठे नुकसान होवून अनेक तास वीज गायब होताना दिसते. www.konkantoday.com