मशिदीत होणाऱ्या अजान बद्दल रत्नागिरीतील मुस्लिम बांधवानी घेतला महत्त्वाचा निर्णय
मशिदीत होणाऱ्या अजान बद्दल रत्नागिरीतील मुस्लिम बांधवानी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता रत्नागिरी शहरात आता दररोज सकाळची अजान भोंग्याचा उपयोग न करता होईल असे त्यांनी रत्नागिरी पोलिसांसमोर स्पष्ट केले आहे.त्याचवेळी भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणार असल्याचेही मुस्लिम बांधवानी यावेळी स्पष्ट केले आहे.४ मेपासून मशिदीवरील भोंग्यांबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी रत्नागिरी शहरातील मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी घेतली. यामध्ये सकाळची अजान हि भोंग्याचा वापर न करता केली जाईल तसेच भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्य सूचनांची अंमलबाजवणी केली जाईल अशी स्पष्ट भूमिका यावेळी मुस्लिम बांधवानी पोलिसांसमोर मांडली. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडला तर कायदा हातात न घेता पोलिसांना त्याची कल्पना देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. मुस्लिम बांधवांच्या या भूमिकेमुळे पोलिसांनी स्वागत केले आहे .
www.konkantoday.com