राज्यात २० मे पर्यंत अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात उन्हाचा आणि पावसाचा दुहेरी मारा सुरू आहे. आज मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात तर लगतच्या मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट, सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार हवामान विभागाने नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात मेघगर्जना विजांचा कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोपडलं आहे. काही ठिकाणी उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तर काही ठिकाणी शेतीचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 20 मेपर्यंत अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आज महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे, तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये तुरळक ठिकाणी काही तासांसाठी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. मात्र, दिवसभर उकाडा जाणवण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.पुढील 24 तासात राज्यात विविध भागात पावसाची शक्यत वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेला इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरीमुळे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता असून जिल्ह्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव, नाशिकमध्येही अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळतीलwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button