करबुडे फाट्यावरील अपघातात कार चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू; ट्रकसोबत समोरासमोर धडक
रत्नागिरी : निवळी-जयगड मार्गावर करबुडे फाटा येथे सोमवारी सकाळी कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातातील कार चालकाचा उपचारादरम्यान मंगळवारी रात्री कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. ओंकार प्रमोद साळवी (राहणार वरची निवेंडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे.
ओंकार साळवी आपल्या ताब्यातील कार (एमएच- 04-जीजे- 2717) घेऊन भरधाव वेगाने जात असताना करबुडे फाट्याजवळ ओंकारचा कारवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरून येणार्या ट्रकला धडक देत अपघात केला होता. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात कारचा पूर्ण चक्काचूर झाला तर ट्रकचा पुढील उजव्या बाजूचे चाक निखळले होते. यात गंभीर जखमी झालेल्या ओंकारला उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले होते. परंतु शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला.