
ओ. पी. जिंदल यांच्या जयंतीनिमित्त जेएसडब्ल्यू कंपनीत रक्तदान शिबिर
जेएसडब्ल्यू समूह आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशनतर्फे स्व. ओमप्रकाश जिंदल यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ७० कर्मचार्यांनी रक्तदान केले.
रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याने ओ. पी. जिंदल यांच्या जयंतीचे औचित्य साधून कंपनीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा आरोग्य विभाग, जेएसडब्ल्यू व जयगड पालिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण ७० कर्मचार्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जयगड सागरी पोलिस ठाण्याचे प्रमुख पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आरोग्याच्या दृष्टीने रक्तदानाचे असलेले महत्व विषद केले. या दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला जेएसडब्ल्यू एनर्जीचे हेड पेदन्ना, जयगड पोर्टचे हेड के. के. दवे आणि कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
www.konkantoday.com