
शंका उपस्थित करणारे किती प्रामाणिक आहेत? हे तपासून पाहावे. -मंत्री उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.त्यांच्या त्या वक्तव्यावरुन शिवसेनेच्याच नेत्याने शिवसेनेचा उमेदवार चिपळूण-संगमेश्वर या मतदरासंघातून पाडला का? त्याचा पराभव केला का? अशी चर्चा रंगली होती. पण, त्यावर आता उदय सामंत यांनी आपलं मौन सोडलं आहे. “शंका उपस्थित करणारे किती प्रामाणिक आहेत? हे तपासून पाहावे. आगामी विधानसभा निवडणुकीत सदानंद चव्हाण हे शिवसेनेचे उमेवार असतील. यावेळी 50 हजारांचा फुगा कसा फुटला हे केवळ मला आणि शेखर निकम यांना माहित आहे, असं मी मी म्हटलं. पण, काही विद्वानांनी विपर्यास केला. चव्हाणांच्या विरोधात कुणी प्रचार केला हे माहित होते. हे मी जाहीरपणे बोललो. सदानंद चव्हाण आणि माझे घरचे संबंध आहेत. पण जे कुणी शंका उपस्थित करत आहेत ते किती प्रामाणिक आहेत हे देखील पाहिले पाहिजे,” असं सामंत यांनी म्हटलं. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दौऱ्यावेळी चिपळूण इथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावल्याचं स्पष्ट केलं.
www.konkantoday.com