
राज ठाकरे यांनी शरद पवारांसारख्या देशातल्या एका आदरणीय व्यक्तीचा अपमान केलाय त्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही – शिवसेना खासदार विनायक राऊत
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मनसेवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष हा भाडोत्री पक्ष आहे, असा टोला विनायक राऊत यांनी लगावलाय. मनसे हा देशातील एकमेव भाड्याचा पक्ष आहे अशी टीका राऊत यांनी केली आहे.दर निवडणुकीला आपला पक्ष भाड्याने द्यायचा ही राज ठाकरेंची परंपरा मागील अनेक वर्षांपासून आहे. आज सुद्धा भाजपाच्या तालावर नाचताना केवळ आणि केवळ बंधू द्वेष आहे. सख्खा भाऊ पक्का वैरी म्हटलं जातं तसं आहे हे. आपला भाऊ म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी बसल्यानंतर आणि केवळ बसल्यानंतर नाही तर देशातील कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रशंसा झालेली आहे. आपला भाऊ मुख्यमंत्री पदी बसला हा द्वेष त्यांना सतावतोय. त्यामधून त्यांच्या मनात द्वेष निर्माण झालाय म्हणून उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी हा राज ठाकरेंचा थयथयाट सुरु आहे,” असा टोला विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावलाय.राज ठाकरे यांनी शरद पवारांसारख्या देशातल्या एका आदरणीय व्यक्तीचा अपमान केलाय त्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. बारामतीमध्ये नव्हते तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शरद पवारांबद्दल असणारा आदर आणि कर्तृत्व याची बरोबर कोणी करुच शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवार हे माझे राजकारणातील गुरु असल्याचा आदराने उल्लेख केलाय. असं असताना काल आलेल्या राज ठाकरेंनी ज्यापद्दतीने शरद पवारांचा अवमान केलाय ते पाहता महाराष्ट्रातील जनता या अपमानाचा बदला घेणार, राज ठाकरेंची जागा काय आहे हे त्यांना दाखवून देणार,” असा इशारा विनायक राऊत यांनी दिलाय.
www.konkantoday.com