
संचारबंदीच्या काळात दाखल केलेले गुन्हे मागे घ्या -शौकत मुकादम यांची मागणी
कोरोना पार्श्वभूमी लॉकडावूनमध्ये संचारबंदीच्या काळात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, हे सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी सरकारकडे केली आहे. लॉकडावूनच्या काळात अनेक तरूण तसेच वयोवृद्ध लोकांना वेगवेगळ्या कामासाठी घराबाहेर पडावे लागले. कोण किराणा मालासाठी तर कोणी औषधासाठी बाहेर पडले होते. अशा लोकांवर आता पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. असे गुन्हे दाखल झाल्याने भविष्यात काहींच्या जीवनावर विपरित परिणाम होवू शकणार आहे. तसेच काहीजणांना पुढील काळात नोकर्या व पासपोर्टसाठी याला अडचणीचे होवू शकतो. जसे सरकार राजकीय व इतर आंदोलनाचे गुन्हे माफ करते त्याप्रमाणे हे गुन्हे माफ करावेत अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.
www.konkantoday.com