रत्नागिरी जिल्ह्यात वामनद्वादशीला जिल्ह्यात १,७०२ गणरायांना निरोप


गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणेत आणि ढोल ताशांच्या गजरात जिल्ह्यात गणेशोत्सवातील वामनद्वादशीच्या दिवशी १ हजार ७०२ खासगी तर २ सार्वजनिक गणपतींना निरोप देण्यात आला. शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शहरातील कर्ला-आंबेशेत, खालची आळी, नाचणे, खालची आळी तसेच शहरानजिक बसणी, काळबादेवी, कोतवडेतील तर जिल्ह्यातील १ हजार ७०२ गणपतींचे तर ९ सार्वजनिक गणपतींचे उत्साहात विसर्जन झाले. जिल्ह्यात ठिकठिकाणी समुद्रकिनारी अथवा तळ्यात गणपतीचे विसर्जन झाले. येथील भाटे व मांडवी किनारी सायं. ४ पासून गणेशभक्तांची वर्दळ वाढली होती. गुरूवारी सकाळी पावसाने चांगल्या प्रकारे वर्णी लावली होती. मात्र दुपारनंतर पावसाने काही उसंत घेतल्यामुळे गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित झाला होता. गर्दी टाळण्यासाठी गणेशभक्तांनीही यावेळी गणपती विसर्जनाला लवकर सुरूवात केली होती. वामन द्वादशीला रस्त्याने जाणारे भक्त ढोल ताशांच्या गजरात विसर्जनाला शांततेत व शिस्तीत मांडवी-भाट्ये किनारी येत असल्याचे दिसत होते. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जागोजागी पथक तयार ठेवले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button