गवाणेतील शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाला ठोकल्या बेड्या
लांजा : गवाणे येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा मुख्याध्यापक नथू सोनवणे याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. शनिवारी ३० एप्रिल रोजी लांजा पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयासमोर उभे केले असता 4 मे पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
गवाणे येथील सहावीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून मुख्याध्यापक नथू सोनवणे हा फरार झाला होता. त्याचा शोध लागत नसल्याने पोलिसांच्या पथकाने पुणे येथे जाऊन त्याच्या मुलाला ताब्यात घेतले होते. शुक्रवारी २९ एप्रिल रोजी त्याला घेऊन लांजा पोलिसांचे पथक उशिरापर्यंत त्याची चौकशी करत होते. नथू सोनवणे याच्यावर रविवारी २४ एप्रिल रोजी लांजा पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गेल्या रविवारपासून तो बेपत्ता होता. अखेर पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली.