दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे फुल्ल! रेल्वेमध्ये जागा नसल्याने हापूसची पार्सल रत्नागिरी रेल्वेस्टेशनमध्ये पडून
रत्नागिरी : मध्य रेल्वेकडून सुटणार्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधील माल डब्यात जागा नसल्याने गेले तीन दिवस साडेचारशे किलो आंबा रत्नागिरी रेल्वेस्टेशनवरच पडून राहिला आहे. दिल्लीला जाणार्या गाड्यांमध्ये दक्षिणेकडून येणार्या गाड्यातील मालडबे ‘फूल्ल’ होऊन येत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आंबा स्थानकावर राहिल्याने एका उत्पादकाचे सुमारे सव्वा दोन लाखांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी राजधानीला जोडलेल्या डब्यांमध्ये पावणेचारशे किलो हापूस राहील एवढी जागाच नसल्याने निदर्शनास आले. एर्नाकुलमवरुन येणार्या या गाडीत मटण भरण्यात आल्यामुळे हापूसला जागाच मिळाली नाही. याबाबत रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील टपाल कक्षाकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा सगळा प्रकार पुढे आला. दक्षिणेकडील रेल्वेस्थानकांवरच माल डबे फुल्ल होत असल्याने कोकणातून जाणार्या मालाला जागाच शिल्लक राहत नाही.