
बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये वीज कोसळल्याने १०६ लोकांचा जीव गेला
देशात मान्सून दाखल झाल्याने जोरदार पावसाचा क्रम सुरु झाला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात वादळ-वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये वीज कोसळल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये वीज पडून तब्बल ८३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये २३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात मिळून १०६लोकांचा वीज पडल्याने जीव गेला आहे.
www.konkantoday.com