
रत्नागिरीत मनसेकडून होणार हनुमान चालिसा पठण
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात जिल्हा मनसेच्यावतीने 3 मे रोजी हनुमान चालिसा पठण आणि महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांसह संलग्न असणार्या इतर वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन देतेवेळी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सौंदळकर, चिटणीस सुनील साळवी, जिल्हा संघटक रुपेश जाधव, मनविसे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, मनोज देवरुखकर, प्रकाश गुरव, जयेश दुधरे, सचिन कामेरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. हनुमान चालिसा आणि महाआरती करण्यासाठी मनसेकडून शहर पोलिसांकडे ध्वनीक्षेपक लावण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्जही करण्यात आला आहे. मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांच्या नेतृत्वाखाली हनुमान चालिसा पठण आणि महाआरती केली जाणार आहे. 3 मे रोजी सकाळी 8.30 वा. मांडवी समुद्रकिनारी असणार्या जोंधळ्या मारुती मंदिराजवळ आणि सकाळी 11 वा. मारुती येथील हनुमान मंदिराजवळ हा कार्यक्रम केला जाणार आहे.