सोन्सूरे येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर या तरुण कलाकाराने महाराष्ट्रातील पहिले ‘वाळू शिल्प कलादालन’उभारले
कोकणातील समुद्र किनारे व त्यावरील स्वच्छ वाळू हे पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे
समुद्रकिनारी फिरण्यासाठी व मौजमजेसाठी आलेल्या लहान मुलांकडून किनाऱ्यावर मातीची घरे बांधताना आपण पाहत असतो.मात्र या वाळुला दर्जेदार आकार दिला तर त्यातूनही सुंदर कलाकृती समोर दिसते त्यालाच वाळू शिल्प कला असे ही म्हणतात..वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोन्सूरे येथील प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर या तरुण कलाकाराने महाराष्ट्रातील पहिले विजयश्री ‘सेंट आर्ट म्युझियम’ म्हणजेच ‘वाळू शिल्प कलादालन’ आरवली सोन्सूरे येथे उभारले आहे. या म्युझियम मध्ये त्यांनी अनेक सुंदर अशी वाळूशिल्पे साकारली आहेत.
या म्युझियम मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यास नक्की वाव आहे.
सोन्सूरे येथील या म्युझियमचे उद्घाटन मठाचे क्षेत्राधिकारी शिवचैतन्य आजोबा, जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी रविराज चिपकर, शिवसेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, ग्रामसेवक श्री धाकोरकर तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
वाळु शिल्प साकारणे तसे कठीण असे आहे, मात्र मी प्रामाणिक प्रयत्नांमुळे ते शक्य करू शकलो. असे रविराज यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
या म्युझियम बाबत संकल्पना मला मी ओडिसा येथे आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प म्युझियम मध्ये सहभाग घेतला होता त्यावेळी सुचली. माझे आजोबा सद्गुरु बाल दत्तनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने मुळे हे म्युझियम मी सुरू करू शकलो असे रविराज यांनी सांगितले.
आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यातील जास्तीत जास्त पर्यटक हे समुद्रकिनाऱ्यांवर येत असतात. या किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना किनाऱ्यावरील वाळू पासून बनवलेल्या आकर्षक कलाकृती पाहता याव्यात हा या मागचा उद्देश आहे. वाळू शिल्प ही कठीण कला आहे, पण मी मी सातत्य टिकऊन शिकलो आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान या उद्घाटना नंतर बोलताना सर्वच मान्यवरांनी या म्युझियम ला शुभेच्छा दिल्या आणि रविराज चिपकर याच्या या आगळ्या वेगळ्या कलेचे कौतुक केले आहे. तसेच या वाळू शिल्प कलेमुळे सिंधुदुर्गात नव्हे तर राज्यात आणि देशात गावाचे नाव मोठे होईल असे उपस्थितांनी सांगितले