ई-बाइकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

0
136

गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक बाइकने अचानक पेट घेतल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीदेखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे आतापर्यंत अशा सात घटनांची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत ई-बाइकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ई-बाइकमध्ये लिथियम-आयन अर्थात लि-आयन या बॅटऱ्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.
स्मार्टफोन आणि लॅपटॉपमध्येही या बॅटऱ्यांचा वापर केला जातो.
इतर बॅटऱ्यांच्या तुलनेत या वजनाने हलक्या आणि अधिक कार्यक्षम असल्याचे मानले जाते.
या बॅटऱ्या चार्जिंगवेळी अधिक तापल्यानेच आतापर्यंतच्या दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.

इलेक्ट्रिक गाड्यांना कोण प्रमाणित करते?
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) या दोन संस्था भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांना प्रमाणित करतात. इलेक्ट्रिक गाड्यांच्या चाचण्यांबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
चीनकडून आयात होणाऱ्या हलक्या दर्जाच्या सेलबाबत तज्ज्ञांनी निषेध केला असून हा प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना गरजेच्या असल्याचे मत व्यक्त केले आहे.ज्या कंपनीने ई-बाइक बनवली आहे त्यांच्या चार्जरनेच गाडीचे चार्जिंग करा. गाडी पाण्यात भिजली असेल तर लगेचच चार्जिंग करू नका. चीननिर्मित बॅटऱ्यांऐवजी भारतात तयार केलेल्या बॅटऱ्यांचा आग्रह धरा. गाडी रात्रभर चार्जिंगला ठेवू नका. ड्रायव्हिंगवेळी जळाल्याचा वास आल्यास दुर्लक्ष करू नका. लगेचच तपासणी करा.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here