
गणेशगुळे समुद्रकिनारी डॉल्फिन मासा आढळला मृतावस्थेत
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनारी डॉल्फिन मासा मृतावस्थेत सापडून आला. पोलिस पाटील संतोष लाड तसेच चिन्मय रांगणकर यांच्या नजरेस हा मासा पडल्यानंतर त्याला जीवदान देण्याच्या उद्देशाने येथील तरुणांनी काही प्रमाणात प्रयत्न केला. परंतु सदरचा डॉल्फिन मासा सुमारे आठ ते दहा फूट लांबीचा व दीडशे ते दोनशे किलो वजनाचा असल्याने त्याला बाजूला करणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्याला जखमी अवस्थेत जीवदान देणे कठीण बनले. अखेर रात्री आलेल्या समुद्राच्या भरतीमध्ये हा मासा पाण्यात गेला.




